कोल्हापूर : जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघामध्ये दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून मतमोजणीची प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यात 23 नोव्हेंबर रोजी विजयी उमेदवाराची विजयी मिरवणुक काढणे, विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते, कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष, संस्था यांनी गावातून, शहरातून मिरवणूक, रॅली काढणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे व फटाके लावणे, फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात होणारा सार्वत्रिक उपद्रव टाळण्यासाठी देण्यात आलेला हा आदेश दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहणार असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये तातडीच्या प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे.