शरद पवारांची इचलकरंजी येथे भर पावसात विराट सभा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरदचंद्र पवारांची इचलकरंजी येथे भरपावसात विराट सभा पार पडली.

 

 

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निष्ठावंतांना बळ द्या तसेच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन शरद पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले.

सभा सुरू असतांनाच पावसाने हजेरी लावली. नागरिकांनी खुर्च्या डोक्यावर घेत भर पावसात पवार यांची सभा ऐकली. पाऊस, विधानसभा निवडणूक आणि पवारसाहेब हे समीकरण महाराष्ट्राने २०१९ च्या निवडणुकीत पाहिलेले आहे.

त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा होणार असल्याची जाणीव जमलेल्या स्वाभिमानी जनतेच्या उदंड अश्या प्रतिसादातून आज पुन्हा एकदा दिसून आली.

शरद पवार यांनी आम्हा उमेदवारांचे हातात हात घेऊन दिलेली साथ नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा एल्गार करणार असल्याची खात्री पटली,असे मत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केले.

यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.