शिरोळ तालुक्याला २ हजार कोटी रुपयांचा निधी देणारे यड्रावकर हे पहिले आमदार – प्रमोद पाटील

खिद्रापूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्याचं पालकत्व स्वीकारले आहे. शिरोळ तालुक्यात २ हजार कोटी रुपयांचा निधी देणारा हा तालुक्यातील पहिला आमदार आहे.तळागाळातील सर्वच समाजाला सोबत घेवून त्यांनी जो विकास साधला आहे,तो खरोखरचं कौतुकास्पद आहे.त्यामुळे खिद्रापूरसह पंचक्रोशितून त्यांना मोठे मताधिक्य देवून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार,असे प्रतिपादन छत्रपती ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील यांनी केले.

 

 

खिद्रापूर येथे राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार फेरीत गावातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.मंदिरासमोर सभेचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमोद पाटील बोलत होते.
यावेळी हियायत मुजावर,दयानंद खानोरे,यांनी आपल्या मनोगतातून आमदार यड्रावकर यांच्या विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी बहुजन विकास आघाडीचे नेते रणजीतसिंह पाटील,दादासो लडगे, शिवसेनेच्या माधुरी टाकारे,भाजपाचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे,उपसरपंच पूजा पाटील – खानोरे,सरताज ढालाईत, जयश्री लडगे,आप्पाण्णा खोत,हिदायत मुजावर,सुरेश यड्रावे,अण्णासो कुरुंदवाडे,मिजाखान मोकाशी, हैदरखान मोकाशी,द्वारपाल लडगे, अभिनंदन सुनके,प्रकाश रायनाडे,गणेश नाटेकर,बाळू कुलकर्णी,जितेंद्र कागवाडे,शिवकुमार पाटील,बापू माने, सलीम मोकाशी,मनोज जमादार, रावसाहेब रायनाडे,बाळासाहेब नाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार जिनेंद्र कागवाडे यांनी मानले.