राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ शहापूर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा

कुंभोज : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार शशिकला जोल्ले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा जाधव मंगल कार्यालय, शहापूर येथे संपन्न झाला.

 

 

या संवाद मेळाव्यात महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या विकासासाठी नवा अध्याय उलगडण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी पारदर्शक आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाची ग्वाही दिली, ज्यातून जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील.

याप्रसंगी मिश्रीलाल जाजू, भाजप शहर अध्यक्ष पै. अमृत भोसले, पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील, अहमद मुजावर, रांगोळीच्या सरपंच सौ. संगीता नरंदे, ऋषभ जैन, भाऊसो आवळे, दादासो भाटले, सचिन हेरवाडे, रणजीत आनुसे, सतीश पंडित, संतोष कांदेकर, राजू कबाडे, रमेश पाटील, किसन शिंदे, शिवदीप बंडगर, सौ. पूनम जाधव, सौ. शोभा भाट, सौ. अश्विनी कुबडगे, धोंडीराम जावळे, पांडुरंग सोलगे, शितल अमन्नावर, रविंद्र चव्हाण, के. के. कांबळे, रवि मिणेकर, पांडुरंग सोलगे, सचिन पोवार, कृष्णा सातपुते, पंकज कांबळे, अरुण केसरे, समीर मुल्ला, आनंदा दोपारे, अक्षय भाट, इम्रान हावेरी, राजेंद्र आरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

🤙 8080365706