कोल्हापूर : हळदवडे (ता. कागल) येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसन मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे, आकाश अस्वले, किरण खवरे, समाधान साबळे, उदय बैलकर व संजय आरागडे यांनी मा हसनसो मुश्रीफ व नविद मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देत मुश्रीफ गटात प्रवेश केला.

ज्या विश्वासाच्या भावनेने मुश्रीफ गटात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तड़ा आम्ही जाऊ देणार नाही. या युवकांचे, कुटूंबीय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन.असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
यावेळी भडगावचे सरपंच बी. एम. पाटील, संजय भराडे व प्रमोद चौगले उपस्थित होते.
