कोल्हापूर : गोकुळचे माजी अध्यक्ष रविंद्र पांडुरंग आपटे (वय ७१ रा. सन्मित्र हौसिंग सोसायटी) यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले.प्रायव्हेट हायस्कूलमधील शिक्षणानंतर कोल्हापूर येथील कृषि महाविद्यालयातून बीएस्सी ॲग्री आणि राहूरी कृषि विद्यापीठातून एमएस्सी ॲग्रीचे शिक्षण त्यांनी घेतले होते.
पदव्यूत्तर शिक्षणात सुवर्णपदक पटकावणाऱ्या रविंद्र आपटे यांना विदेशामध्ये नोकरीची मोठी संधी असतानाही त्यांनी आपल्या आजरा तालुक्यातील शेतीमध्ये लक्ष घातले. आजरा तालुक्यात पहिल्यांदा संकरित गायी आणल्या. १९८६ पासून सलग ३५ वर्षे ते गोकुळचे संचालक आणि तीन वेळा अध्यक्ष होते. महानंदचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. गेली चार वर्षे ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात खूप मोठा परिवार आहे.