म्हाकवेत लवकरच बुद्धविहार उभारू:हसन मुश्रीफ: थळोबा मंदिराची वास्तूशांती व समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात

म्हाकवे:माझ्या राजकीय वाटचालीत म्हाकवे ता. कागल येथील दलित समाजाचे महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांची बुद्धविहाराची मागणी आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास अद्यावत असे बुद्धविहार उभारु, असे अभिवचन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

 

म्हाकवे ता.कागल येथील थळोबा मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच रमेश पाटील होते.

मंञी श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, शेतमाल बाहेर काढण्यासाठी आणि गावात जागेअभावी शेताशिवारात घरे बांधून राहणाऱ्या कुटुंबाना ये- जा करण्यासाठी मजबूत रस्ते गरजेचे आहेत. यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजने” ची प्रभावी अंमलबजावणी करुन येत्या तीन वर्षात मतदारसंघातील सर्वच पाणंद रस्ते पुर्ण करु.

यावेळी जीवन कांबळे, रवींद्र कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. ए. टी. पाटील, माजी उपसरपंच रामचंद्र पाटील, एस. के. पाटील, दत्ता कांबळे, प्रकाश कांबळे, आनंदा ससाणे, बाळासाहेब कांबळे, दिनकर कांबळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सदाशिव गोरे यांनी केले. चंद्रकांत कांबळे यांनी आभार मानले.

*लाडक्या बहिणींसाठी…..!*
जिल्हा बँकेत लाडक्या बहिणीचे अनुदान येणाऱ्या महिलांना उद्योग, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा बँकेतून एकाचवेळी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे लाडक्या बहिणीच्या अनुदानातून दरमहा १२५० रुपयांप्रमाणे परत करायचे आहेत.

सुर्यघर योजनेला कर्ज…..!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सुर्यघर योजनेला गती देण्यासाठी जिल्हा बँकेतून १ ते तीन किलो वॅटनुसार कर्ज दिले जाणार आहे. एक किलोवॅटला ३८ हजार प्रमाणे येणारे शासनाचे अनुदान या कर्जखात्यात वर्ग होणार आहे. तर ; उर्वरित रक्कम दरमहा ५०० रुपये प्रमाणे तीन वर्षांत परतफेड करायची आहे. बँकेच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.

🤙 8080365706