कोल्हापूर : कोल्हापूर येथील अयोध्या कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड येथील भिमराव महिपती पोवार (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
दैनिक सकाळ कोल्हापूरचे वृत्तसंपादक तानाजी पोवार यांचे ते वडील होय. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (सोमवार) सकाळी ९.३० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.