कोल्हापूर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान आहे ,त्यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीतील नेतेमंडळीनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे इचलकरंजी मतदारसंघातील उमेदवार मदन सिताराम कारंडे यांच्या प्रचारार्थ निर्धार परिवर्तन सभा पार पडली. या सभेला आमदार सतेज पाटील उपस्थित होते.आमदार सतेज पाटील जनतेला संबोधित करताना म्हणाले कि, सभेला नागरिकांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद हा महाविकास आघाडीला असणारा जनतेचा भक्कम पाठींबा दर्शवत होता.
यावेळी प्रदेश सचिव शशांक बावचकर, ज्येष्ठ नेते हिंदुराव शेळके, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, प्रताप होगाडे, माजी नगरसेवक अजित जाधव, स्मिता तेलनाडे, रणजीत जाधव, सागर चाळके, मलकारी लवटे, शिवसेनेचे सयाजी चव्हाण, प्रकाश मोरबाळे, वसंत माळी, प्रकाश सुतार, सदा मलाबादे, वैभव उगळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.