कोल्हापूर : केंद्रीय दक्षता आयोग नवी दिल्ली यांच्या संकल्पनेतून भ्रष्टाचारा विरुध्द जनजागृती होणेच्या उद्देशाने दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्यात “सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी” ही संकल्पना घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील, उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहाचे ब्रीदवाक्य “सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्र समृध्दी” हे ठेवण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक दक्षता उपायांचा भाग म्हणून सर्व कार्यालये व संस्थांना क्षमता वाढवण्याचे, संस्थात्मक सुधारणेचे, परिपत्रके, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावीचे अद्ययावतीकरण कराण्याचे, प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्याचे आणि डिजिटल माध्यमांवर उपस्थिती सुधारण्यासाठी उपक्रम घेण्याचे आवाहन करतो, विकसित भारताचे उद्दीष्ट गाठण्यासाठी भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. व त्यासाठी निरंतर दक्षता ठेवणे आवश्यक आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सर्वांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वचनबध्द होण्याचे आवाहन करुन सप्ताहाच्या सफलतेसाठी आपल्या शुभेच्छा हा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सत्यनिष्ठा प्रतिज्ञेचे वाचन केले व प्रतिज्ञा दिली. दिलेल्या सत्यनिष्ठा प्रतिज्ञा मध्ये आपल्या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा प्रमुख अडथळा असून भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्व घटकांनी संघटितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद होते.
प्रत्येक नागरिकाने दक्ष राहायला पाहिजे आणि सदैव प्रामाणिपणा व सचोटी यांच्या उच्चतम मानकांप्रती वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्द लढा देण्यासाठी साथ दिली पाहिजे. जीवनात सर्व क्षेत्रात सच्चेपण आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही अणि लाच देणार नाही. सर्व काम प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन, व्यक्तीगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन असे मुद्दे प्रतिज्ञेमध्ये नमूद होते.