कोल्हापूर :काँग्रेसने दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील व काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात चढाओढ लागली होती. आज शनिवार काँग्रेसने यादी जाहीर केली आहे. यात गणपतराव पाटील यांना शिरोळी ची उमेदवारी मिळाली आहे.
केडीसी बँकेच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी विधानसभेसाठी आमदार करणार असल्याचे शब्द जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी गणपतराव पाटलांना दिला होता. अखेर सतेज पाटील यांनी दिलेला शब्द खरा करीत गणपतराव पाटील यांना उमेदवारी मिळवून आणली आहे. गणपतराव पाटील यांना अधिकृतरित्या उमेदवारी घोषित झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
काँग्रेसने आज जाहीर केलेले उमेदवार खालील प्रमाणे
1.भुसावळ = डॉ. राजेश तुकाराम मानवतकर
2.जळगाव=डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर
3.अकोट= महेश गणगणे
4.सावनेर=अनुजा सुनील केदार
5.वर्धा= शेखर प्रमोदबाबू शेंडे
6.नागपूर दक्षिण= गिरीश कृष्णराव पांडव
7.कामठी =सुरेश यादवराव भोवर
8.भंडारा= पूजा गणेश ठक्कर
9.अर्जुनी मोरगाव =दिलीप वामन बनसोडे
10.आमगाव =राजकुमार पुरम
11.राळेगाव =वसंत चिंदूजी पुरके
12.यवतमाळ =अनिल बाळासाहेब शंकरराव मंगुळकर
13.अरणी= जितेंद्र शिवाजीराव मोघे
14.उमरखेड=साहेबराव दत्ताराव कांबळे
15. जालना=कैलास गोरंट्याल
16.औरंगाबाद पूर्व =मधुकर कृष्णाराव देशमुख
17.वसई=विजय गोविंद पाटील
18.कांदिवली पूर्व=काळू बढेलिया
19.चारकोप=यशवंत जयप्रकाश सिंघ
20.सायन कोळीवाडा=गणेश कुमार यादव
21.श्रीरामपूर=हेमंत ओगळे
22.निलंगा=अभयकुमार सतीशराव साळुंखे
23.शिरोळ= गणपतराव आप्पासाहेब पाटील