समरजित घाटगेंना निवडणुकीसाठी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर येथील कॉम्रेड नागरिकांचा पाठिंबा

कोल्हापूर : कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर मतदारसंघात कॉम्रेडसंपतराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी आणि कॉम्रेड नागरिकांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे यांना पाठिंबा दर्शवण्यात आला.

 

 

या पाठिंब्यामुळे आमची ऊर्जा वाढली असून शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्याच खांद्यावर आहे, असे नमूद केले. याप्रसंगी मिळालेल्या पाठिंब्यामुळे येत्या काळात विजयश्री आपलीच असेल, यात शंकाच नाही.असे मत समरजित घाटगे यांनि व्यक्त केले.