मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे- आमदार राजू बाबा आवळे

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे. यासाठी कोल्हापूर खंडपीठ कृती समिती व वकिलांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार राजू बाबा आवळे उपस्थित राहिले.

कोल्हापूर खंडपीठासाठी गेली 35 वर्षे कोल्हापुरात विविध स्तरावरून आंदोलने करण्यात आली आहेत. सहा जिल्ह्याचा हा लढा आहे.
त्यामुळे सर्किट बेंच किंवा खंडपीठ झालेच पाहिजे अशी मागणी सर्वांनी एकमताने केली. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.