कोल्हापूर प्रतिनिधी युवराज राऊत
शिवसेनेच्या (ठाकरे) गट शिव -आरोग्य सेना जिल्हा समन्वयक पदी ओंकार मोहिते यांची निवड झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि आरोग्य सेनेचे राज्य कार्याध्यक्ष किशोर ठाणेकर, समन्वयक जितेंद्र सपकाळ, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते देण्यात आले . आरोग्य सेनेच्या सहसचिव पदी गोविंद वाघमारे सहसमन्वयक अमित पै, शहराध्यक्ष संतोष पाटील, शहर समन्वयक विराज ओतारी, आणि शहर सहन्वयक म्हणून रितेश पाटील यांची निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांना उपनेते संजय पवार सह संपर्कप्रमुख विजय देवणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी ,समन्वय हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे ,अवधूत साळुंखे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले