कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार केला जात आहे. मंदिरे उध्वस्त केली जात आहे. तेथील लष्कर आणि हंगामी सरकार हिंदूंचे रक्षण करण्यास समर्थ दिसून येत आहे. भारतातही लँड जिहाद ,लव जिहाद , गोहत्या अशा समस्या सातत्याने वाढत असून युवतींचे गायब होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे गो हत्त्येचा कायदा असूनही अनेक ठिकाणी गोरक्षकावर हल्ले होत आहेत गायींची कत्तल होत आहे वफ्फ द्वारे हिंदूंच्या जमिनी बळकवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे एकूणच हिंदू धर्म यावर होणाऱ्या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी 17 ऑगस्टला हिंदू धर्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली
या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निरंजन शिंदे, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, सकल हिंदू समाजाचे अभिजीत पाटील , विकी चरक,शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत ,विश्व हिंदू परिषदेचे अनिल दिंडे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई ,शिवसेनेचे अर्जुन आंबी, मराठा तेतुका मेळावा संघटनेचे योगेश केरकर राष्ट्रीय स्वयंसेवक अनिरुद्ध कोल्हापुरे आधी पदाधिकारी उपस्थित होते