शहाजी महाविद्यालयात ‘श्रावणधारा’ कवी संमेलन उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील

दसरा चौक येथील शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या  शहाजी छत्रपती महाविद्यालयात सोमवारी श्रावणधारा कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.35 हून अधिक प्राध्यापक,विद्यार्थ्यांनी या कवी संमेलनामध्ये सहभाग नोंदवून उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या.या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण हे होते. मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग, शिवाजी ग्रंथालय आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त श्रावणधारा हे कवी संमेलन झाले. पाऊस, निसर्ग, श्रावण या विषयावरील कवितांचे सादरीकरण या संमेलनात करण्यात आले.
प्रारंभी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण व सहाय्यक ग्रंथपाल यु. यु. साळोखे यांच्या हस्ते करून या कवी संमेलनाचे उद्घाटन झाले. मराठी, हिंदी इंग्रजी विषयातील पाऊस, निसर्ग, श्रावण या विषयावरील मान्यवर कवींच्या आणि स्वतः तयार केलेल्या कवितांचे वाचन नवोदित कवींनी यावेळी केले.
कवी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, कविता हा उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार आहे. कवितेला लय असतो, हुंकार असतो, ताल असतो, रिदम असतो.सौंदर्याचा लयबद्ध अविष्कार म्हणजे कविता असते. कवितेत निर्व्याज प्रेम असते. मानवी जीवनामध्ये व्यक्ती क्रांती करू शकते, प्रेम करू शकते अथवा ती रूक्ष राहू शकते. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे’ ही बालकवींची कविता तसेच संदीप खरे यांची पाऊस , गुरु ठाकूर यांची ‘कातरवेळी बसलो होतो’ कवी सौमित्र यांच्या कवितांचे वाचनही त्यांनी यावेळी करून दाखवले.
या काव्य संमेलनात श्रुती संजय कुरणे, राजश्री पांडुरंग शेळके, अर्पिता अजय साबळे, संतोष सोनबा शेळके, श्रावणी बुरसे, ऋतिका माने,समीर बारे, भागोजी वरख, सादिया बागवान, फतीमा सय्यद, अमृता माने, तराना पेरवे, पायल जाधव या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. तसेच प्रा. डॉ.के एम देसाई,डॉ.सारिका कांबळे प्रा. अमर शेळके, डॉ विजय देठे, डॉ शोभा चाळके, प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे प्रा. अक्षय भोसले, डॉ रचना माने, प्रा. अस्मिता इनामदार, डॉ एस एस पाटील यांनी उत्स्फूर्तपणे कवितांचे सादरीकरण केले. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. डॉ. पल्लवी कोडक, डॉ. एन. एस. जाधव, डॉ. एस एस पाटील यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन प्रा.पी.के.पाटील यांनी केले. आभार डॉ.रचना माने यांनी मानले.
यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे.,डॉ शिवाजी जाधव ,डॉ .एस.एस राठोड यांचे सह प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने या कवी संमेलनास उपस्थित होते.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंगराव बोंद्रे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. यावेळी कवितांवरील ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्तीची शपथ देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली.