लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशसह एकूण आठ राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदान सुरु असतानाच पश्चिम बंगालमध्ये बॉम्बफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्याचे मतदान होत आहे मात्र या राज्यातील दक्षिण 24 परगना या भागात हिंसेच्या काही घटना घडल्या. या भागात बॉम्बफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण 24 परगना शहरातील भांगड या भागात ही बॉम्बफेक झाली आहे.
जादवपूर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या भांगडमधील सतुलिया या भागात आयएफएस आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. यात दोन्ही बाजूचे एकूण दहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत.