बहिरेश्वर येथे शाॅर्ट सर्किट ने दुचाकी जळुन खाक

बहिरेश्वर प्रतिनिधी : मौजे बहिरेश्वर येथील शेतकरी बाजीराव चव्हाण हे आपली बजाज कंपनीची मोटारसायकल घेऊन जनावरांना चारा आणण्यासाठी तळी नावाच्या शेतात गेले होते.  मोटारसायकल रस्त्यावर पार्किंग करून दुपारच्या रखरखत्या उन्हात वैरण काढण्यात व्यस्त असताना रखरखत्या उन्हामूळे शाॅर्ट सर्किट होवून गाडी ने अचानक पेट घेतला. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण शेतवडीत पाण्याची कमतरता आणि त्याच्यात उन्हाचा तडाखा यामुळे जळत्या मोटारसायकलची आग आटोक्यात आणण्यात दुचाकी मालक व उपस्थित नागरिक अपयशी ठरले. त्यात संपूर्ण गाडी जळून खाक झाली.