छत्रपती शाहूंच्या प्रचारार्थ कोल्हापूरात महिला मेळावा

इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ भव्य महिला मेळावा, केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे याज्ञसेनीराजे महाराणीसाहेब छत्रपती, सरोज पाटील माई, शांतीदेवी डी.पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि प्रचंड गर्दीमध्ये पार पडला.

देशातील दडपशाही कायमची संपवण्यासाठी नारीशक्तीने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी केले. देशात गेला काही वर्षापासून एकाधिकारशाही सुरू आहे, सरकारी यंत्रणांचा वापर करून दडपशाही केली जात आहे. लोकशाही कायम टिकवण्यासाठी हीच संधी आहे असे सरोज पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार जयश्री जाधव म्हणाल्या 18 पगड जाती, महिलांची उन्नती, शेती, राधानगरी धरण, उद्योगधंदांना चालना देऊन कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराजांनी समृद्ध केले. राजर्षी शाहू महाराजांच्या ऋणातून उतराई होण्याची वेळ आली आहे. तर मेघा पानसरे यांनी कोणत्या विचाराचे सरकार निवडून द्यायचे हे ठरवणारी ही निवडणूक असून स्वातंत्र्यलढ्यात ज्याप्रमाणे महिला रस्त्यावर उतरला होत्या त्याप्रमाणे महिलांना संविधान वाचवण्यासाठी आपला आत्मसन्मान पुन्हा मिळवण्यासाठी धाडसाने पुढे आले पाहिजे.

यावेळी संयोगिताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, सरलाताई पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्षा शुभांगी पोवार, भारती पोवार, मेघा पानसरे,पद्मा तिवले, डॉ. दश्मिता जाधव, माजी महापौर शोभा बोंद्रे, वंदना बुचडे, स्वाती यवलुजे, वैशाली डकरे, निलोफर आजरेकर, तेजस्विनी पाटील, संध्याताई घोटणे, प्रतिज्ञा उत्तुरे, सुलोचना नाईकवडे, मनिषा गवळी, अश्विनी बारामते, माधुरी लाड, वृषाली कदम, जयश्री चव्हाण, कल्पना माने तसेच इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.