गवती चहाचे फायदे

चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात गवती चहाचे काही फायदे. 

 

सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.

पोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.

गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.

थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.

शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.