सुंदर शाळा स्पर्धेचे शनिवारी पुरस्कार वितरण

कोल्हापूर :  जिल्हा परिषदेच्या वतीने शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ व जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कळंबा येथील जय पॅलेस सभागृहात हा कार्यक्रम झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आ. प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार झाला. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.