जवाहर नगर दत्त कॉलनी येथे महिला दिन उत्साहात साजरा….

कोल्हापूर : जवाहर नगर दत्त कॉलनी येथे महिला दिन उत्साहात पार पडला. यावेळी महिलांनी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा स्वतःसाठी वेळ काढत हा दिवस अतिशय आनंदात साजरा केला. महिला दिनाचे औचित्य साधत यावेळी भागातील महिलांनी  केक कापून हा दिवस साजरा केला. महिला दिनाच्या निमित्ताने यावेळी महिलांनी मधुर गाण्यांच्या  तालावर ठेका धरत आपला आनंद द्विगुणित केला..

जवाहरनगर दत्त कॉलनी येथे दत्त तरुण मंडळाच्या प्रांगणात अनेक वयोगटातील मुलींनी, महिलांनी तसेच जेष्ठ वयोगटातील महिलांनी
 हजेरी लावत केक कापून 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपला आनंद साजरा केला. यावेळी भागातील महिलांनी एकमेकीला घास भरवत अनेक आठवणींना उजाळा देत या दिवसाची रंगत वाढवली.या दिवसानिमित्त अनेक फनी गेम्स तसेच अनेक मधुर गाण्यांच्या तालावर ठेका धरत महिला व मुलींनी या दिवसाचा आनंद लुटला. अल्पोपहारचा आस्वाद घेत महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देत अनेक खेळांचा मनमुराद आनंद लुटला. एकमेकींची गळा भेट घेत यावेळी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी भागातील अनेक महिला व मुली उपस्थित होत्या.