आयोजकांसह मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांनी एकत्र यावे आणि या लढ्यात सहभागी व्हावे यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या, रॅली काढल्या. बीडमध्ये अशाच पद्धतीने जेसीबीने फुले उधळत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हे सर्व करत असताना त्यांनी या ठिकाणी सभा किंवा रॅली काढणार आहेत याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याची कायदेशीर परवानगी घेणे गरजेचे होते पण आयोजकांकडून या गोष्टी झाल्या नाहीत. आयोजक आणि मनोज जरांगे यांच्याकडून यावेळी कायद्याचे उल्लंघन झाल्याने पेठ बीड आणि पिंपळनेर येथे पोलिसांनी मनोज जरांगे आणि अन्य 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जेसीबीचा धोकादायक पद्धतीने वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.