अन्यथा १४ गावातील जनतेला घेऊन आपल्या खात्याविरोधात आंदोलन: करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

कोल्हापूर: सातारा ते कागल सहा पदरीकरणाचे काम चालु असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगांव, उजळाईवाडी, उंचगांव या रोडवर खुदाईचे काम चालु आहे. या कामादरम्यान गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणी योजना जिवण प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामूळे संबंधित अधिकारी यांनी इथून पुढे कोणत्याही प्रकारे पाईपलाईनला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित कॉन्ट्रॅक्टर व हायवे रस्त्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

सद्या सातारा ते कागल या दरम्यान सहा पदरीकरणाचे काम चालु असून गांधीनगर नळपाणी योजनाच्या पाईपलाईनला आपल्या खात्याकडून खुदाई करत असताना धक्का लागून गळती लागत आहे. या १४ गावच्या गांधीनगर नळ पाणी योजना महाराष्ट्र जिवण प्राधिकरणाच्या योजनेव्दारे पाणी पुरवठा केला जातो. उंचगांव सारख्या मोठया गावालाही या योजनेचा आधार असूनअन्य अनेक मोठया गावासाठी कोणताही पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने आपल्या खात्याकडून रस्त्याच्या कामासाठी खुदाई करत असताना ३ ते ४ वेळी मग, गोकुळ शिरगांव जैन मंदीराजवळ असेल, लक्ष्मी टेकडी कागल व उजळाईवाडी हायवे ब्रिज जवळ तसेच सरनोबतवाडी आपल्याऑफिसच्या समोर पाईपलाईनला धक्का लागुन गळती लागली असून कडक उन्हामध्ये पाण्याची टंचाई या गावांना बसु लागली आहे. एकदा गळती लागली की, ती गळती काढण्यासाठी २ ते ३ दिवस लागत असल्याने मोठया गावांना अन्य पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने संपूर्ण जनतेचे जन जिवन विस्कळीत होतआहे. तरी आपल्या खात्याकडून सदर जिवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनला कोणताही धक्का लागू नये याबाबत आपल्या खात्याकडून संबंधित कॉन्ट्रक्टरला सूचना व्हाव्यात जेणे करून या १४गावच्या पाणी पुरवठा विभागावर कोणताही परिणाम होता कामा नये. आपला कॉन्ट्रक्टर व जिवनप्राधिकारणाचा प्रतिनिधी यांनी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनचा सर्व्हे करूनत्याठिकाणी रस्त्याच्या खुदाईचे काम करावे. हया १४ गावच्या नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनला धक्का लागणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी भर उन्हाळयात जर का आपल्या कामामुळे पाईपलाईनला गळती लागली तर १४ गावातील नागरिकांना घेवून व करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयाच्या दारात तिव्र स्वरूपाची निर्देशने करूनआपल्या खात्याचा निषेध करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन करवीर शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव यांनी चंद्रकांत भरडे मॅनेजर सो भारतीय राष्ट्रीय राजमार्गे प्राधिकरण उजळवाडी यांना दिला.

यावेळी राजु यादव शिवसेना करवीर तालुकाप्रमुख, दीपक रेडेकर उंचगाव प्रमुख, राहुल गिरुले उपतालुका प्रमुख, योगेश लोहार युवा सेना तालुकाप्रमुख, शरद माळी, उत्तम आडसूळ विभाग प्रमुख,संतोष चौगुले, दीपक पोपटाणी विभाग प्रमुख, दीपक अंकल शाखाप्रमुख, सुनील पारपानी उपशाखाप्रमुख , किशोर कामरा, अजित चव्हाण,आबा जाधव, प्रफुल घोरपडे, मनोज कुरळे, दत्तात्रेय विभूते, राजू राठोड आधी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.