घरफाळा दंडामध्ये 50 टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस

कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास दंडव्याजामध्ये महापालिकेच्यावतीने 50 टक्के सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा आजचा शेवटचा दिवस आहे.

या योजनेस शहरातील मिळकतधारकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेमध्ये शहरातील आजअखेर 6257 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेला 8 कोटी 29 लाख इतका घरफाळा वसूल झाला आहे.घरफाळा विभागाच्यावतीने हि सवलत योजना दि. 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 अखेर असून निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 50 टक्के दिली होती. शुक्रवार, दि.16 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 अखेर निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

तरी 50 टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस राहिले असलेने नागरिकांनी चालू बिलासह थकीत रक्कम एकरकमी रोख, धनादेश, डिमांड ड्राफटव्दारे, ऑनलाईन सिस्टीम द्वारे (फोन पे,गुगल पे,मोबाईल वॉलेट द्वारे) भरुन या योजनेचा लाभ घ्यावा. ही रक्कम महापालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये कार्यालयीन वेळेत भरता येईल. तरी संबंधीत सर्व मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.