दिल्ली : केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि कृषीतज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली.
यापूर्वी केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती.विशेष म्हणजे, यापूर्वी एका वर्षात सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार 1999 मध्ये देण्यात आले होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 4 मोठ्या व्यक्तींना हे सन्मान प्रदान केले होते. आता मोदी सरकारने तो रेकॉर्ड मोडित काढत पाच व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारने भारतरत्न दिलेल्या व्यक्ती उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश राज्यातील आहेत. अशाप्रकारे सरकारने उत्तर ते दक्षिण भारत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे.