या फळभाजीच्या सेवनामुळं शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी होईल… 

हृदयविकाराच्या झटक्याने कमी वयातच तरुणांना प्राण गमवावे लागत आहेत. अलीकडेच 30 च्या आतील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत.हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल असू शकते. कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो आणि त्याची पातळी वाढत राहिल्यानेहृदयविकार, मज्जातंतू संबंधित रोग, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

शरीरात साचलेले वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यासाठी तुम्ही काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका फळ भाजीबद्दल सांगणार आहोत ज्याच्या सेवनामुळं शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी होईल. 

टॉमेटोचा ज्यूस आरोग्यासाठी खूपच लाभकारी आहे. याचा उपयोग एनर्जी आणि स्पोर्ट्स ड्र्रिंक म्हणूनही केला जातो. कारण यात पाणी आणि मिनरल्सची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळं शरीर तंदुरस्त ठेवण्यास मदत होते. टॉमेटोच्या ज्यूसमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन आणि पोटेशियम, फॉस्फोरससारखे अनेक पोषकतत्वे असतात. कोलेस्ट्रॉलसाठीही टॉमेटोचा ज्यूस रामबाण ठरु शकतो. अनेक संशोधनात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टॉमेटोचा ज्यूस खूप फायदेशीर आहे. रोज कप म्हणजेच 240 ml टॉमेटोचा ज्यूस प्यायल्यास 10 टक्के कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. 

टॉमेटोमध्ये आढळणारे अँटीऑक्सीडेंट लाइकोपीन शरीरात साचलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. आत्तापर्यंत 13 संशोधनातून समोर आले आहे की, 25 mgपेक्षा जास्त लाइकोपीन सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा 10 टक्के कमी होते. म्हणूनच टॉमेटो कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. जर्नल ऑफ फूज सायन्स अँड न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, दररोज एक ग्लास टॉमेटोचा ज्यूस प्यायल्यास हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत मिळते. मात्र, टॉमेटोचा ज्यूस मीठ न टाकता प्यावा. 

टॉमेटोचा ज्यूस यकृत (लिव्हर) डिटॉक्स करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. या ज्यूसमुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही किडनी स्टोनचे रुग्ण असाल किंवा तुम्हाला कॅल्शियमयुक्त पदार्थांची समस्या असेल तर टॉमेटोचा रस पिण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही गंभीर आजार असला तरीही तुम्ही टॉमेटोचे सेवन सावधगिरीने करावे आणि त्याचे जास्त सेवन करू नये.