आंतरराष्ट्रीय टीचर्स ऑलिंपियाड परीक्षेत प्रा. डॉ.अक्षता गावडे यांची टॉप 30 परसेंटाइल शिक्षक म्हणून निवड

कोल्हापूर: जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शिक्षक ऑलिंपियाड परीक्षेत देशभक्त डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथील समाजशास्त्र विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा.डॉ. अक्षता गावडे यांचे 94 देशातील तीन लाख शिक्षकांमधून टॉप 30 पर्सेंटाइल ग्लोबल टीचर म्हणून निवड करण्यात आली.

अध्यापन शास्त्र संबंधातील विविध सहा क्षेत्रामधील सखोल ज्ञान या परीक्षेमध्ये तपासून, जवळपास 120 पानांचा रिपोर्ट परीक्षार्थींना देण्यात आला आणि त्यावरून डॉ.अक्षता गावडे यांना ग्लोबल थर्टी पर्सेंटाइल शिक्षक म्हणून घोषित करण्यात आले. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील पहिल्या शिक्षक आहेत.

कर्नाटक येथील जोयडा या दुर्गम भागात जन्मलेल्या प्रा. अक्षता गावडे यांनी शालेय व बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण करून बीए अर्थशास्त्र समाजशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथून पूर्ण केले. त्यानंतर एम ए समाजशास्त्र व अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले तसेच सेट आणि नेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. दिव्यांगांचा सामाजिक व आर्थिक दर्जा एक विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएचडी संपादन केली. हे सर्व शिक्षण संपादन करणाऱ्या त्यां गावातील पहिल्याच व्यक्ती आहेत.
सहा भाषांवर प्रभुत्व असलेल्या डॉ.अक्षता गावडे या उत्तम वक्त्या आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठाचा बेस्ट पार्लमेंटरीयन अॅवॉर्ड, बेस्ट स्पीकर अॅवॉर्ड मिळवला असून इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स कर्नाटक यांनी त्यांना त्यांच्या संशोधन प्रबंधासाठी यंग रिसर्चर व रिसर्च एक्सलन्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे.

इंटरनॅशनल आयटेरिटिव्ह पब्लिशर्स मीचिगन यूएसए यांनी फ्युचरस्टिक ट्रेंड्स इन सोशल सायन्सेस या पुस्तकाच्या संपादनासाठी संपूर्ण भारतातून निवड केलेल्या चार प्राध्यापकांमध्ये त्यांचा समावेश आहे.
आज पर्यंत त्यांनी 50 हुन अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनपर लेखनांचे वाचन आणि प्रकाशन केले असून अनेक पुस्तकांचे अनुवाद लेखनही केले आहे. त्या सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. या कार्याची दखल घेऊन नुकतेच त्यांना मुक्ता फाउंडेशनने आदर्श शिक्षिकेचा पुरस्कारही प्रदान केलेला आहे. सध्या दिव्यांग व्यक्तींच्या समावेशक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या अध्ययनतंत्र या विषयावर त्यांचे संशोधन सुरू आहे.

जागतिक स्तरावर मिळवलेल्या या कार्याची दखल कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या शहाजी विधी महाविद्यालयाने देशभक्त डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समृतिदिनानिमित्त घेऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याना संस्थेच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य वैभव पेडणेकर,कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही ए पाटील सर, शहाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण पाटील सर, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.जे.फराकटे व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए.जाधव यांचे मार्गदर्श नआणि कुटुंबीयांचे प्रोत्साहन लाभले.
त्या विश्वविक्रमवीर अनोज्ञा व संविधान कन्या, ग्लोबल पीस ॲम्बेसिडर प्रा.डॉ.अनुप्रिया गावडे यांच्या आई आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सीए अमितकुमार गावडे यांच्या पत्नी हो त.यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.