क्रीडाई कोल्हापूर तर्फे ‘दालन २०२४’ च्या माहीतीपत्रकाचे प्रकाशन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : क्रिड़ाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू व बांधकाम विषयक प्रदर्शन (दालन २०२४) चे आयोजन महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर दि.९ ते १२ फेबुवारी २०१४ च्या दरम्यान आयोजित केले आहे. दालन २०२४ व्या माहीतीपत्रकाचे प्रकाशन कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या व जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या शुभ हस्ते व हरिष धार्मीक, उपविभागीय अधिकारी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रेसिडन्सी क्लब, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे संपन्न झाला.

क्रीडाईचे कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना संघटनेच्या ३५ वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा घेत क्रीडाईने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोवर शहराच्या विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकात टाकला. क्रीडाई कोल्हापूरने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले असून यामध्ये बाल संकुलनाची एक इमारत बांधून दिली, दुष्काळ ग्रस्तांना धान्य व चारा मदत, अवनि संस्थेस मदत, आय. आर बी ने कोल्हापूर शहारात रस्त्यांच्या मध्यभागी लावलेल्या झाडांना वर्षभर टँकरद्वारे पाणी घालून जोपासना करणे, पर्यावरण दिनांच्या निमित्ताने शहरामध्ये झाडे लावणे, क्लिन कोल्हापूर या कोल्हापूर महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत महानगरपालिकेस कचरा कुंडया प्रदान करणे, २०१९ व २०२१ या माला कोल्हापूरला आलेल्या पुराच्या वेळी मदत, पूराच्या वेळी मदत व्हावी या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेस बोट प्रदान, केरळ पुरग्रस्तांना आर्थिक मदत, पर्यावरणपुरक विषयक गणपती विर्सजनास एकटी संस्थेस मदत, गणेश विसर्जन काळात आहोरात्र संरक्षण असणा-या पोलिसांना पाणी बॉटल व अल्पोपहार वाटप, २०२० साली आलेल्या महाभयंकर कोरोना च्या काळात कोव्हिड सेंटर उभारून कोरोना ग्रस्थांना मदत अशा विविध उपक्रमात हिरीरीने भाग घेतला आहे.

त्याचप्रमाणे अकरा मजली इमारती जशा महत्त्वाच्या आहेत तशीच येथील वृक्षसंपदा देखील महत्वाची आहे. ऐतिहासिक कोल्हापूर जपण, कलानगरी, क्रीडानगरी, उद्योगनगरी ही वैशिष्टये असणा-या कोल्हापूरसाठी बांधकाम व्यावसायिकांची इच्छा, अनुभव, कार्यक्षमता वापरणं हा यापुढील काळातील संस्थेचा सेवा दृष्टीकोन आहे. दालन या प्रदर्शनाची माहीती देताना या दालनचे वैशिष्ट्य म्हणजे सन १९९२ साली बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरवात झाली असून आजतागायत झालेली सर्व दालने यशस्वी झाली असून कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या ठीकाणचे बांधकाम व इमारत साहित्य विषयक नवनवीन प्रोजेक्ट उपलब्ध होणार आहेत व त्यातून त्यांना आपल्या पसंतीचे घर निवडता येणार आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे या वेळचे दालन वैशिष्टपूर्ण असेल असे सांगितले.

दालन २०२४ विषयी बोलताना दालनचे चेअरमन चेतन वसा यांनी दालन हा उपक्रम क्रीडाई कोल्हापूर तर्फे दर ३ वर्षानी आयोजित केला जातो. परंतु क्रीडाई कोल्हापूरच्या सभासदांची वाढती संख्या विचारात घेऊन तसेच सभासदांचे सध्या चालू असलेले प्रोजेक्ट पहाता यापुर्वी तीन वर्षांनी घेतले जाणारे दालन दोन वर्षानी घेण्याचा निर्णय क्रीडाई कोल्हापूरने घेतला आहे. यंदाचे दालन २०२४ हे क्रिडाई कोल्हापूर तर्फे भरवले जाणारे १२ वे दालन आहे.

यावेळी बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, क्रीडाईने केलेल्या मागणीनुसार डीपी डिपार्टमेंटमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहोत.एव्हिटिबी व्हावा यासाठी शासनाकडे मागणी केली आहे.दालन 2024 च्या नियोजनाबाबत महापालिकेच्या वतीने पूर्ण सहकार्य केले जाईल असेही आयुक्त के. मंजूलक्ष्मी यावेळी म्हणाल्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले,मोफा ॲक्ट कोल्हापुरात क्रीडाईतील कोणावरही नाही,त्यावरून क्रीडाईच कार्य कळतं. रेरर असल्यामुळे बिल्डरला वेळेत काम करावं लागतं प्रोजेक्ट पूर्ण करताना त्यांना बऱ्याच अडचणी येतात माझे काही मित्रही आहेत त्यांच्याकडून कळतं की हा व्यवसाय करताना किती अडचणी येतात. कोल्हापूर पोलीस दलाकडून या दालनाला शुभेच्छा देतो.

यावेळी या कार्यक्रमास क्रीडाही कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी खोत ,उपाध्यक्ष सचिन ओसवाल ,व्हाईस चेअरमन प्रमोद सावंत, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, खजानिस अजय डोईजड ,दालन 2024 चे चेअरमन चेतन वसा ,समन्वयक अतुल पवार ,सचिव गणेश सावंत, सहसचिव संग्राम दळवी ,खजानीस श्रीधर कुलकर्णी, सह खजानिस उदय नीचिते तसेच कोल्हापूरचे पदाधिकारी व क्रीडाई कोल्हापूर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.