बिद्रीत के.पी. पाटलांचा एकतर्फी विजय ; विरोधकांना चांगलाच धक्का…

बिद्री : बिद्रित दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत के पी पाटलांचा एकतर्फी विजय झाला असून सर्व 25 पैकी 25 जागा जिंकत सत्ताधारी आघाडीने विजयी पताका फडकवली आहे.

6000 ते 6500 मतांनी सत्ताधारी आघाडीने वर्चस्व राखले आहे.श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने विरोधी आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष ए. वाय. पाटील,समरजीतसिंह घाटगे यांच्या राजर्षी शाहु शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा एकतर्फी धुव्वा उडविला आहे. सत्ताधारी आघाडीच्या सर्व 25 पैकी 25 जागा जिंकुन ‘बिद्रीत के. पी. पाटील यांनी विरोधकांना चांगलाच धक्का दिला आहे.