कोल्हापूर: कोल्हापूर येथे 5 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात 52 वा थानपिर विजय दिवस कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालक रमेश निर्मळे, स्वागत सुभाष कांबळे, त्रिशरण पंचशील संदीप कांबळे, प्रस्तावना सुधीर कांबळे ,बटालियन चा इतिहास भीवाप्पा कांबळे यांनी मांडला.
फोटो पूजन शहीद आनंदा सुदाम मोरे, तसेच शहीद जवान विजेंद्र साबळे फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महार रेजिमेंट चा इतिहास या कार्यक्रमात सांगण्यात आला. महार रेजिमेंट आतापर्यंत श्रीलंका, भूतान, दक्षिण आफ्रिका, सुदान, या देशात आपली सेवा बजावली. कॅप्टन नामदेवराव कांबळे हे सैन्य दलातून रिटायर झाल्यावर त्यांना लकवा या आजाराने यांच्यावर धाड टाकली तरीसुद्धा ते आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. सर्वांनी यांचे भरभरून कौतुक केले. 1971 च्या युद्धामध्ये त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली होती. युद्धामध्ये सहभागी झालेले सैनिक यांचा सत्कार व शहीद सैनिक परिवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख सत्कार मा.श्रीकांत नडगिरेसर, मा.बापू घाटगे,मा.गोपाल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहीद जवान आनंदा मोरे,तसेच शहीद विजेंद्र साबळे यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला. सैनिकांचे कर्तव्य सांगताना अनेकांच्या परिवारातील डोळ्यात पाणी आले. या कार्यक्रमाला 13 महार रेजिमेंटचे सर्व परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व सैनिक आजी-माजी सैनिक भावनुक झाले. सैन्य काय असतात कसे त्यांचे जीवनमान असते ते सेवा कुठल्या पद्धतीने करतात हा प्रत्यक्ष अनुभव अनेक सैनिकांनी मांडले. बर्फाळ प्रदेशामध्ये, वाळवंटामध्ये 24 तास आपली सेवा बजावणारे महार रेजिमेंटचे सैनिक यांचे कौतुक करण्यात आले. १३ महार रेजिमेंट ची स्थापना 15 जानेवारी 1966 रोजी झाली. व 1971 साली भारत पाकिस्तान युद्धात ह्या युनिट ने जम्मू काश्मीर, पूंच्छ येथे थानपिर पहाडी वरती पाकिस्तान ने कब्जा केला होता. ती पहाडी ५ डिसेंबर १९७१ रोजी १३ महार रेजिमेंट ने लेफ्टनंट कर्नल एन. बी. सिंह ,यांच्या नेतृत्व खाली एक ही सैनिक जखमी न होता थानपीर पहाडी वरती कब्जा केला. भारतीय सेनेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी महार रेजिमेंट चे नाव रोशन केले. यावेळी थांनपीर युद्धाचे अनुभव सांगण्यात आले. महार गाणं म्हणण्यात आले. तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्हातील सर्व थानपिर युनिट चे माजी सैनिक परीवार मिळून विजय दिवस साजरा करण्यात आला. माजी सैनिक रमेश निर्मळे, भीमराव बारामतिकर, सुधीर सरंजामे, सुहास कांबळे, संदीप कांबळे, भिमाप्पा कांबळे, अशोक पवार, विजय भोपळे, अविंनाश हिरवे , महादेव धनवडे , शिवाजी धनवडे यांचे या कार्यक्रमासाठी मोठे योगदान लाभले.