किडनी खराब होण्याची कारणे जाणून घेऊया… 

किडनी आपल्या आपल्या शरीरातील फार महत्वाचा अवयव आहे. आपल्या पूर्ण आरोग्यात त्यांची महत्वाची भूमिका असते. किडनीच्या कामाबाबत सांगायचं तर दर 30 मिनिटांनी किडनी शरीरातील रक्त फिल्टर करणं, टॉक्सिन आणि फ्लूइड बाहेर काढण्याचं काम करते.पण सध्या भारतात क्रॉनिक किडनी डिजीजच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. ही चिंतेची एक मोठी बाब आहे.

किडनीसंबंधी आजारांचे मुख्य कारण

जेव्हा तुमच्या दोन्ही किडनी पूर्णपणे डॅमेज होतात आणि रक्त फिल्टर होत नाही तेव्हा क्रॉनिक किडनी डिजीजच्या समस्येचा सामना करावा लागतो. किडनी योग्यपणे काम करत नसल्याने शरीरात फ्लूइड आणि वेस्ट पदार्थांचं प्रमाण जास्त वाढतं. ज्यामुळे अनेक समस्या जसे की, हृदयरोग आणि स्ट्रोकचाही सामना करावा लागतो. क्रॉनिक किडनी डिजीजमुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिजीज आणि लठ्ठपणा यांचाही धोका असतो.

सायलेंट किलर

किडनी डिजीजला सायलेंट किलर नावाने ओळखलं जातं. कारण याची कोणतीही लक्षणं सुरूवातीला दिसत नाहीत. ही समस्या हळूहळू शरीरात वाढते. ज्याची माहिती मिळवणं फार अवघड असतं. या आजाराची माहिती मिळवण्यासाठी रूग्णाला नियमितपणे ब्लड आणि यूरिन टेस्ट करावी लागते. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस असेल तर गरजेचं आहे की, तुम्ही नियमितपणे आपली ब्लड आणि यूरिन टेस्ट करावी. जेणेकरून किडनी डिजीज वाढण्यापासून रोखता येईल.

किडनी डिजीजचे संकेत

जेव्हा किडनीची समस्या वाढते तेव्हा शरीरा वेगवेगळे संकेत देऊ लागतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे संकेत….

वजन आणि भूक कमी लागणं

टाचांवर सूज

श्वास घेण्यास समस्या

थकवा

लघवीमधून रक्त येणं

सतत डोकदुखी

इतर समस्या

क्रॉनिक किडनी डिजीजमुळे अनेक इतरही समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, एनीमिया, सहजपणे इन्फेक्शन होणं, शरीरात कॅल्शिअम कमी होणं, पोटॅशिअम आणि फॉस्फोरसचं प्रमाण वाढणं.

कसा कराल बचाव?

क्रॉनिक किडनी डिजीजपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं. ब्लड आणि लघवीची नियमित टेस्ट करा. या आजाराचा धोका टाळण्यासाठी लाइफस्टाईलमध्ये बदल, मेडिकेशन, रेग्युलर मेडिकल चेकअप गरजेचं आहे.