भोगावतीत सत्ताधारी गटाचीच बाजी;विरोधकाना एक जागा

भोगावती प्रतिनिधी:भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाली. यामध्ये सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले मात्र कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांचा पराभव झाल्याने सत्तारूढ गटाला जोरदार धक्का बसला. तेथे संस्थापक आघाडीचे एकमेव उमेदवार व माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर हे विजयी झाले.

या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सत्ताधारी गटाचे नेतृत्व आमदार पी एन पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील ,माजी आमदार संपतराव पवार पाटील आदी नेते करत होते.

विजयी उमेदवार असे:राधानगरी तालुक्यातील कौलव गटातून उमेदवार राजाराम कवडे व धीरज डोंगळे राशिवडे गटातुन मानसिक पाटील, अविनाश पाटील, कृष्णराव पाटील प्राध्यापक ए.डी. चौगले कसबा तारळे गटातून अभिजीत पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय पाटील करवीर तालुक्यातील कुरुकली गटातून शिवाजी कारंडे ,डी आय पाटील, केरबा पाटील, पांडुरंग पाटील सडोली खालसा गटातून रघुनाथ जाधव ,अक्षय पवार-पाटील, बी.ए. पाटील, प्राध्यापक शिवाजी पाटील Shah दुमाला गटातून प्राध्यापक सुनील खराडे व सरदार पाटील या सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला.

सत्ताधारी आघाडीच्या महिला राखीव गटातून सीमा जाधव , रंजना पाटील अनुसूचित जाती गटातून दौलू कांबळे इतर मागासवर्ग गटातून हिंदुराव चौगुले भटक्या विमुक्त गटातून तानाजी काटकर हे उमेदवार विजयी झाले तर संस्थापक आघाडीतून धैर्यशील पाटील कौलवकर
व सत्ताधारी आघाडीतून उदयसिंह पाटील कौलवकर या चुलत्या-पुतण्यात रात्री उशिरापर्यंत लढत सुरू होती मात्र यात धैर्यशील पाटील कौलवकर यांचा विजय झाला.