भोगावती निवडणूक- पहिली फेरी पूर्ण; सत्तारूढ गटाची आघाडी

भोगावती प्रतिनिधी: भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू आहे. सर्व गटाची पहिली फेरी आता पूर्ण झाली असून यामध्ये सत्ताधारी गटाचे उमेदवार 500 ते 1500 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र संस्थापक आघाडीतून फक्त गट क्रमांक एक मधून माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर 1500 मतांनी आघाडीवर आहेत.

या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रामुख्याने सत्ताधारी राजश्री शाहू आघाडी व संस्थापक आघाडी यांच्यात लढत झाली आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व आमदार पी एन पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील ,माजी आमदार संपतराव पवार पाटील आदी नेते करत आहेत.

मतमोजणीच्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत त्यापैकी एक फेरी आता म्हणजेच नऊ वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली यामध्ये सत्ताधारी गटाने आघाडी घेतली आहे.मतमोजणी पूर्ण होण्यास मंगळवारची पहाट होण्याची शक्यता आहे.आज सकाळी झालेला मतमोजणी वरून किरकोळ वाद वगळता मतमोजणी शांततेत सुरू आहे. पहिल्या फेरीच्या निकालात तर सत्तारूढ गटाने बाजी मारली आहे.