महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विमान चिन्हावर निवडणूक लढवणार…

बिद्री: येथील दूधगंगा वेधगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, आम. सतेज पाटील, माजी आम. संजय घाटगे, गोकुळचे अध्यक्ष अरूणकुमार डोंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला विमान चिन्ह देण्यात आले आहे. आज या चिन्हांचे वाटप झाले. रविवार दि. ३ डिसेंबर ला या कारखान्याची निवडणूक होत आहे. दोन पॅनेल मध्ये दुरंगी लढत होत आहे.

या दूधगंगा सहकारी साखर कारखान्याने राबवलेला सहवीज प्रकल्प देशात नं.1 ठरला आहे. या प्रकल्पास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणारा देश पातळी वरील नं.1 चा पुरस्कार २ वेळा प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सन २०२२-२३ च्या गळीत हंगामात राज्यातील सर्वाधिक ३२०९ असा उच्चांकी दर नुकतेच कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी जाहीर केला आहे. तर कामगारांना १२ टक्के वेतन वाढ दिली आहे.

३ डिसेंबर ला होणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हापूर चे पालक मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री व आम. सतेज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, माजी आम. संजय घाटगे, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरूणकुमार डोंगळे व कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी एकत्र येवून श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी केली असून आघाडीस कारखाना कार्य क्षेत्रातून सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज चिन्ह वाटप झाल्याने उद्या पासून प्रचाराला वेग येणार आहे.