भोगावती कारखाना निवडणुकीसाठी ८६.३३ टक्के मतदान, सोमवारी मतमोजणी


कोल्हापूर (प्रतिनिधी) भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या मतदानात ८६.३३ टक्के मतदान झाले. सोमवारी २० नोव्हेंबर रोजी कसबा बावडा रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृह सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात होणार आहे . दुपारनंतर मतदानाचा कल समजण्यास सुरुवात होणार आहे.


रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून साखर कारखान्याच्या राधानगरी आणि करवीर तालुका कार्यक्षेत्रातील ५८ गावांना मध्ये मतदान प्रक्रिये सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८२ मतदान केंद्रावर एकूण २७ हजार ५६७ सभासदांपैकी २३ हजार ७९३ सभासदाने मतदानाचा हक्क बजावला मतदानाची एकूण आकडेवारी ८६.३३ टक्के इतकी भरली.

सर्वाधिक मतदान राधानगरी तालुक्यातील घोटवडे गावात एका केंद्रावर ९५.६७ टक्के मतदान झाले .याच गावात दुसऱ्या मतदान केंद्रावर ९४ टक्के तर तिसऱ्या मतदान केंद्रावर ९३ टक्के मतदान झाले. कोथळी गावात ९५.१७ तर मोहडे गावात ९४.१६ टक्के मतदान झाले.