जाणून घेऊया अति प्रमाणात भात खाण्याचे दुष्परिणाम…

भारतातील मुख्य अन्न म्हणजे भात. अनेकांना भाताशिवाय जेवणच जात नाही किंवा जेवणाच्या ताटात भात नसेल तर अपूर्ण वाटतं. भात अनेक प्रकार शिजवून खाल्ला जातो.भात खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. ग्रेटर नोएडाच्या GIMS रुग्णालयातील माजी डायटीशियन आयुषी यादव यांनी म्हटलं आहे की, कोणीही अतिप्रमाणात भात खाल्ल्यास शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया अतिप्रमाणात भात खाण्याचे दुष्परिणाम.

अतिप्रमाणात भात खाण्याचे नुकसान

मधुमेहाचा धोका

भातामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्सची मात्रा अधिक असते. त्याची मात्रा अधिक असेल तर ब्लड शुगरचा धोकाही वाढतो. यामुळं मधुमेहदेखील वाढण्याची भीती असते. त्यामुळं भाताचे सेवन प्रमाणात करायला हवे. मधुमेहाच्या रुग्णांनी तर भात खाणे टाळावे. 

व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता

इतर धान्यांच्या तुलनेत भातात सर्वात कमी पौष्टिक घटक असल्याचे दिसून येते. हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे समृद्ध स्त्रोत नाही जे शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक आहे. योग्य स्तरावर या पोषक तत्वांचा अभाव हाडे, दात आणि इतर अनेक प्रकारच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. याव्यतिरिक्त, ते आपली शारीरिक प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात संपूर्ण धान्य खाण्याचा सल्ला दिला जातो. 

वजन वाढण्याचा धोका

भात खाल्ल्यामुळं वजन वाढण्याची शक्यता असते. यात अधिक प्रमाणात कॅलरी असतात. जर तुम्ही अधिक प्रमाणात भात खात असाल तर तुमच्या पोटाची आणि कंबरेची चरबी वाढू शकते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी भात खाण्याआधी त्यांच्या डायटिशनचा सल्ला घ्यावा. कारण तर तुमची वेट लॉस जर्नी सुरू असेल तर अशावेळी व्यायाम व अन्य प्रयत्न करुनही तुम्ही वजन कमी करु शकणार नाहीत. 

बद्धकोष्ठता

भातामध्ये फायबरची मात्रा कमी असते. ज्यामुळं बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. फायबर आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण ते आपली पाचनसंस्था स्वस्थ ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. जर तुम्ही सफेद भात खूप प्रमाणात खात असाल तर त्याबरोबरच फायबरयुक्त आहाराचाही समावेश करा. जसं की, डाळ, भाज्या आणि अन्य प्रथिनेयुक्त आहार.