फाऊंड्री उद्योगांना उपयुक्त सेमिनार संपन्न


बहिरेश्वर (प्रतिनिधी) : पुणे येथे रिफ्रैक्टरी ,फाउंड्री कोटिंग आणि  केमिकल उत्पादन करत असलेली नामवंत कंपनी “ओरेन रिफ्रैक्टरी प्राईवेट लिमिटेड “ चा Foundry उद्योग साठी उपयुक्त असलेला Technical सेमिनार २९ ऑक्टोबर रोजी “VEEKSAR THE FERN “हॉटेल कोल्हापूर, या ठिकाणी फाउंड्री उद्योगासाठी योगदान देणाऱ्या उपस्थित मान्यवरांसमवेत मोठ्या संखेत संपन्न झाला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी “ मयुरा ग्रुप ” चे मालक प्रसिद्ध उद्योगपती मा.श्री.चंद्रशेखर डोली साहेब उपस्थित होते तसेच कोल्हापूर ,सांगली ,सातारा , बेळगाव ,पुणे या ठिकाणाहून नामवंत कंपन्यातील पधाधिकारी सुद्धा मोठ्या उपस्थित होते.
ओरेन रिफ्रैक्टरी, कंपनी गेली २०वर्ष फाउंड्री उद्योगासाठी उत्तम दर्जाचे मटेरीअल चा पुरवठा करत आलेली आहे . Germany कंपनी “EKW” यांच्या सोबत झालेल्या नवीन करारानुसार आता त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची भर पडणार आहे.

ओरेन रिफ्रैक्टरी चे Director मा.श्री सुशील अरोरा, मा .श्री उत्कर्ष दाणे यांनी आपल्या भाषणात सांगितलं कि वार्षिक २५००० मेट्रिक टन capacity असलेला प्लांट आपण आता ६५००० मेट्रिक टनापर्यंत वाढवणार आहोत, आणि त्याचबरोबर Germany स्थित “EKW” कंपनी करारांतर्गत गुजरात मध्ये सुद्धा नवीन प्लांट सुरु करून निर्यातीवर भर देणार आहोत .

EKW आणि ओरेन यांनी संयुक्तरीत्या उत्पादित केलेल्या Product चे उद्घाटन मा. श्री.चंद्रशेखर डोली साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

Technical सेमिनार मध्ये EKW कंपनी चे V.P Mr. बाला मुरगन यांनी फाउंड्री जगतात आपल्या उत्पादनांपासून होणाऱ्या फायद्यांचे विश्लेषण केले .तसेच “ओरेन रिफ्रैक्टरी ” चे Technical and Development Head Mr. चंद्रशेखर रासीनेनी यांनी सेमिनार मध्ये आपल्या उत्पादनांपासून कश्याप्रकारे “Cost Saving ” करता येईल याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.

शेवटी ओरेन रिफ्रैक्टरी चे Director मा.श्री सुशील अरोरा यांनी मान्यवर तसेच मोठ्या संखेने उपस्थित फाउंड्री स्टाफचे आभार मानले.