मुंबई : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला हजेरी लावली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बाबासाहेबांनी जे लिखाण केलं, एक स्वच्छ भूमिका मांडण्याच काम केलं. काहींनी त्याला मान्यता दिली नाही, पण त्यांचा विचार मनापासून आता स्वीकारला गेला आहे.आजचा ऐतिहासिक असा सोहळा आहे. देशाचं संविधान त्यांनी लिहिलं. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्याचा महत्वाचा काळ कोलंबियामध्ये घालवला, नंतर अर्थशास्त्रचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं.
या देशात पाण्याच्या उपयोग कसा करायचा, उभारणी कशी करायची हे त्यांनी लिहिलं, पंजाब आणि हरियाणामध्ये अन्न धान्यची सोय झाली कारण मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी दिला असे शरद पवार म्हणाले.