पाकिस्तानात पुढील दोन दिवसांमध्ये मोठा भूकंप होणार ; वैज्ञानिकाचा दावा..

नवी दिल्ली: नेदरलँडमधील एका रिसर्च इन्स्टिट्यूटने पाकिस्तानात पुढील दोन दिवसांमध्ये मोठा भूकंप येणार असल्याचं म्हटलं आहे. सोलर सिस्टीम ज्यॉमेट्री सर्व्हेच्या (SSGIOS) एका वैज्ञानिकाने हा दावा केला आहे.पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागातील वातावरणात कमी-जास्त दाबाचे पट्टे दिसून आले. हा भूकंपाचा इशारा असल्याचं या वैज्ञानिकाने म्हटलं आहे.

SSGIOS या संशोधन संस्थेने भूकंपासोबतच त्सुनामीचा देखील इशारा दिला आहे. मोरक्कोमध्ये ज्याप्रमाणे विनाशकारी भूकंप झाला होता, तसाच मोठा भूकंप पाकिस्तानात देखील होऊ शकतो असं फ्रँक हूगरबीट्स या वैज्ञानिकाने एक्स हँडलवरून म्हटलं आहे.

फ्रँक म्हणतात, की “30 सप्टेंबरला आम्हाला पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागामध्ये वातावरणीय फ्लक्चुएशन पहायला मिळाले. ही गोष्ट खरी आहे. हा कदाचित एका मोठ्या भूकंपाचा इशारा असू शकतो. (मोरक्कोमधील भूकंपावेळी देखील असेच इशारे मिळाले होते.) मात्र हा भूकंप होईलच हे आम्ही खात्रीने सांगू शकत नाही.”

या वैज्ञानिकाने यापूर्वी तुर्कीये आणि सीरियामधील भूकंपांची देखील भविष्यवाणी केली होती. यामुळे सध्या दिलेल्या इशारामुळे पाकिस्तानातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. फ्रँक यांची पोस्ट पाकिस्तानातील सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानातील राष्ट्रीय त्सुनामी केंद्र, कराचीचे संचालक अमीर हैदर लघारी यांनी फ्रँक यांचा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, की भूकंप कधी आणि कुठे येणार याची कोणीच भविष्यवाणी करू शकत नाही. पाकिस्तानातील जमीनीखालून दोन टेक्टॉनिक प्लेटांच्या सीमा जातात. या सीमांवरील कोणत्याही पॉइंटवर भूकंप येऊ शकतो, ज्याची भविष्यवाणी करणं शक्य नाही.