उचगावात पाच तास विसर्जन मिरवणूकरात्री10 ला साउंड बंदउचगाव प्रतिनिधी

उचगाव तालुका करवीर येथे घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती यांचे एका दिवशी विसर्जन करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे घरगुती गणेश मूर्ती बरोबरच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती देखील विसर्जित करण्यातआल्या विसर्जन मिरवणुक तब्बल सात तास सुरू होती रात्री 10 वाजता मिरवणूकितील साऊंड सिस्टीम बंद करण्यात आली यावेळी मंडलांनी वेळ वाढवून द्यावी म्हणून ठिय्या मारला पोलिसांनी मध्यस्ती करत मिरवणूक शांततेत पार पडली

उचगाव फाट्यावर शुक्रवार रात्री पासूनच डॉल्बी व लाईट जोडण्यात येत होती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळानी रांगेत जाण्यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी सोडत कडून नंबर निश्चित केले होते
सांयकाळी पाचच्या सुमारास मिरवणुकिला सुरवात झाली क्रांती तरुण मंडळ व नवविकास तरुण मंडळाने पालखीतुन गणेशमूर्ती नेत विसर्जन केले पारंपरिक वाद्याच्या गजरात मोजक्याच मिरवणुका काढल्या पाऊसाने उघडीप दिलेने तरुणाईचा उत्साह प्रचंड होता
अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती ग्रामपंचायतीने सुतार मळा याठिकाणी क्रेन ची सोय केली होती त्याठिकाणी सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच वैजयंती यादव व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिवस वर उभे राहुन गणेशमुर्ती विसर्जनाची चांगली सोय केली होती तसेच अनेकांनी मूर्तीदान उपक्रमास सहकार्य केले निर्माल्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार ट्रॅक्टरट्रॉली मध्ये निर्माल्य स्वीकारले जात होते
रात्री आठ नंतर आकर्षक विद्युत रोषणाईने व साऊंड सिस्टीम ने संपूर्ण मुख्य रस्ता उजळून गेला होता उचगाव फाट्यावर
स्वराज ग्रुपने पारंपरिक पध्दतीने सहभाग घेतला छावा ग्रुप संयुक्त मंगेश्वर गल्ली समर्थ सेवा मंडळ क्लासिक ग्रुप दोस्ती ग्रुप सम्राट ग्रुप जयशिवराय तालीम बालवीर तालीम गुजरी कॉर्नर युवा स्पोर्ट्स मंगोबा स्पोर्ट्स शिवशक्ती स्पोर्ट्स मंगेश तरुण मंडळ छत्रपती ग्रुप ब्रह्मनाथ तरुण मंडळ पंचरत्न तरुण मंडळ यांनी आकर्षक मिरवणुका काढल्या होत्या मंगेश्वर मंदिर परिसरात शिवसेनेच्या वतीने तसेच शिंदे गट व भाजपच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते त्याठिकाणी मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला
मिरवणूक10 वाजता बंद केल्यानंतर उचगाव मंगेश्वर मंदिर परिसरात मंडळांनी व पदाधिकारी यांनी ठिय्या मांडला यावेळी शहर पोलीस अधीक्षक अजितकुमार टिक्के पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व पोलिसांनी मध्यस्ती करत सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केले व मंडळांनी मिरवणूक मार्गस्थ केली
संघर्ष ग्रुप व संकपाळ काँप्लेक्स कला क्रीडा मंडळ यांनी भाविकांना मसाले भात वाटप केले

गांधीनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी पोलीस निरीक्षकअर्जुन घोडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही रात्री10च्या सुमारास सर्व साऊंड सिस्टीम बंद करण्यात आल्या मिरवणूक शांततेत पार पडली