सोनं झालं स्वस्त

मुंबई : महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर उतरले असून १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ५९,३५० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५९,५१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती.

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,७५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,४०४ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,३५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये आहे.

🤙 9921334545