
कोल्हापूर : दूध उत्पादकांनी बाजारपेठेतील म्हैस दूधाची वाढती मागणी विचारात घेता म्हैस दूध उत्पादनावर अधिक भर द्यावा. असे मत ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील संपर्क सभेत व्यक्त केले.

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्हा सह. दूध (गोकुळ) संघाच्यावतीने बुधवारी (ता.२३) अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली या संपर्क सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शाहूवाडी तालुका कधीकाळी गोकुळला दूध पुरवठा करण्यात अग्रेसर होता. मात्र सद्या याच्या उलट परिस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी पुढे यावे, यासाठी संघाकडून शक्य तितके सहकार्य करण्याची ग्वाही अध्यक्ष डोंगळे यांनी दिली.