भारत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणार चांद्रयान-३

वाराणसी : आज भारत चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ उतरवणार आहे. सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जगाला पहायला मिळणार आहे. या क्षणाची सर्वांनाच आतुरता लागली आहे.

कोणत्याही अडथळ्याशिवाय विक्रम लँडरचे चंद्रावर प्रक्षेपण व्हावे आणि चांद्रयान-३ हे मिशन यशस्वीपणे पार पडावे यासाठी संपुर्ण देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.दरम्यान, चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यास हा पराक्रम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.