जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आवारातील दोन खोल्या झेरॉक्स व चहापान स्टॉल साठी भाडेतत्वावर उपलब्ध

कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार लॉनच्या पाठीमागील दोन्ही चेंजिंग रुमच्या मधील जागेमध्ये नवीन दोन रुम (शेड) तयार करण्यात आले आहे. या दोन रुम (शेड) झेरॉक्स व चहापान स्टॉलसाठी भाडेतत्वार देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल राहुल माने यांनी दिली आहे.

झेरॉक्स व चहापान स्टॉल चालवू इच्छुकांनी अर्जामध्ये मासिक भाड्याची रक्कम नोंद करुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावे. माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत.अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर ०२३१-२६६५८१२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माने यांनी केले आहे.