उत्तरकार्याचा खर्च टाळून साबळेवाडी शाळेस एलईडी भेट..

दोनवडे :उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा देत त्या पैशातून शालेय उपयोगी एलईडी टिव्ही देण्याचा एक सामाजिक वेगळा उपक्रम साबळेवाडी ता.करवीर येथील कै. विलास महादेव पाटील यांच्या कुटुंबियांनी राबवला.

साबळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी विलास पाटील यांचे नुकतेच निधन झाले. निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत ५ दिवसात सर्व विधी आटोपले.

त्यानंतर उत्तरकार्याचा खर्च टाळून त्या रक्कमेतून शालेय उपयोगी एलईडी टीव्ही प्राथमिक विद्यामंदिर साबळेवाडी या शाळेस भेट दिले. या उपक्रमाबद्दल विलास पाटील यांचा मुलगा प्रवीण ,पुतण्या यशवंत पाटील, उत्तम पाटील, जयवंत पाटीलभाऊ अप्पासो पाटील, बाबुराव पाटील, राजेंद्र केरबा पाटील, शामराव पाटील,ज्ञानदेव पाटील, संभाजी साबळेयांनी पुढाकार घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.