
कोल्हापूर : शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभावसाखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करण्याची मागणी केली आहे.
तसेच इथेनॉलच्या किंमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याने केंद्र सरकारने तातडीने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली.
वाढलेल्या महागाईमुळे उसाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेली असून यंदा एफ.आर. पी पेक्षा वाढीव दर दिल्याशिवाय हा उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे. याकरिता साखरेचा बाजारातील किमान दर ३८ रूपये करून साखर निर्यात धोरण निश्चित करण्याची गरज आहे.देशात पामतेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते.
याचा विपरीत परिणाम सोयाबिनच्या दरावर होत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या सोयाबिन उत्पादीत होत असलेल्या भागात होत आहेत. तसेच सोयाबिनच्या पेंडीच्या आयातीवर देखील निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.