कपड्यांवरील चिवट डाग घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स…..

बऱ्याच वेळा कपड्यांवर एखादा डाग लागतो, जो सहजासहजी जात नाही. हे हट्टी, चिवट डाग घालवण्यासाठी काही ट्रिक्स फॉलो केल्यास उपयोग होऊ शकतो.

बऱ्याच वेळा शर्टावर पानाचे किंवा तसेच काही पदार्थांचे डाग लागतात, जे काढणं खूपच कठीण असतं. या डागांमुळे कपडे वापरण्याजोगे रहात नाहीत. खसाखसा धुवूनही ते डाग जात नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही आंबट दह्याचा वापर करू शकतात. आंबट दही या डागांवर लावून १० मिनिटे ठेवावे व नंतर हाताने चोळून, घासून, धुवा.

गडद आणि हट्टी डाग काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात कपडे धुणे फायदेशीर ठरते. कपड्यांवर चहा-कॉफी पडली असेल आणि त्याचे डाग काढायचे असतील, तर कपडे कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर साबण आणि डिटर्जंट पावडर लावून पुन्हा कोमट पाण्यानेच स्वच्छ करावेत. असे केल्याने डाग निघून जातात.

किचनमध्ये वापरल्या जाणार्‍या मीठ आणि लिंबाच्या मदतीने कपड्यांवरील ग्रीसचे डाग सहज काढता येतात. लिंबू व मीठ वापरल्याने फारसा परिणाम होत नसेल, तर मीठात अल्कोहोल टाकूनही तुम्ही कपडे स्वच्छ करू शकता. या उपायांनी हट्टी व चिवट डाग जाण्यास मदत होईल.