
मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने आज मोठा निर्णय घेतला आहे. समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने व्याजदर स्थिर ठेवण्याचे निश्चित केले आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन आज रेपो दरांबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, जागतिक स्तरावर व्याजदर दीर्घकाळ उच्च राहतील. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महागाई आणि कर्जाची आव्हाने कायम आहेत. भारत इतर देशांच्या तुलनेत आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम आहे. रेपो दर ६.५ टक्के राहील, अशी घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एमपीसीच्या बैठकीनंतर केली. ते म्हणाले की, बँका मजबूत आहेत. एनपीए कमी झाला आहे. कॉर्पोरेट बॅलन्स शीट मजबूत झाली आहे. भारताची मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वे कायम आहेत. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. भाज्यांच्या किमती वाढल्याने महागाईवर परिणाम झाला आहे. जुलै-ऑगस्टमध्ये महागाई वाढण्याची शक्यता झाल्याचे आरबीआय गव्हर्नर यांनी व्यक्त केली आहे.