कॉंग्रेसला तेलंगणात वायएसआर तेलंगणाच्या रूपाने मित्रपक्ष मिळणार?

हैदराबाद :- वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वाय.एस.शर्मिला यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे खासदारकी पुन्हा बहाल झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यामुळे कॉंग्रेसला तेलंगणात वायएसआर तेलंगणाच्या रूपाने मित्रपक्ष मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी असणाऱ्या शर्मिला यांनी केलेले ट्विट लक्षवेधी ठरले. त्यांनी राहुल यांचे अभिनंदन करतानाच मोदी सरकारविरोधात लोकसभेत मांडण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावाला नैतिक पाठिंबा दर्शवला. त्यातून कॉंग्रेस आणि वायएसआर तेलंगणा या पक्षांची आगेकूच हातमिळवणीच्या दिशेने सुरू असल्याचे सूचित झाले.